-जागतिक योग दिवस-
International Yoga Day
योग: कर्मसु कौशलम्
International Yoga Day
योग: कर्मसु कौशलम्
![]() |
Yog Sadhna / योग साधना.
|
‘योग साधना’ ही आपल्या देशाने जगाला व मानवतेला दिलेली अमूल्य भेट आहे. योग साधना ही फक्त शारीरिक
आरोग्यच नव्हे, तर बौद्धिक, भावनिक, आध्यात्मिक आणि सामाजिक विकासाची गुरूकिल्ली असून याचा स्वीकार वैश्विक
स्तरावर सुद्धा झालेला आपणांस दिसत आहे. याचीच प्रचीती म्हणजे संयुक्त
राष्ट्र संघात देखील 'योग' साधनेला एकमताने स्वीकारले आहे. २१ जून हा
दिवस संपूर्ण जगात जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो. २१ जून हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे आणि योग साधेनेने देखील मनुष्याला दीर्घायुष्य लाभते म्हणुनच २१ जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला
जातो. पहिला जागतिक योग दिवस २१ जून २०१५ रोजी साजरा करण्यात आला.
प्राचीन काळापासूनच 'योग साधना' हा भारतीय संस्कृतीचा अभिन्न
अंग आहे. योग साधनेचा विचार केला तर हिंदू धर्माचे आराध्य दैवत म्हणजेच भगवान शिव
यांना पहिले योगी/आदि योगी तसेच पहले गुरू/आदि गुरू मानले जाते. पूर्व वैदिक काळ (२७०० ईसा पूर्व) काळापासून तर महर्षी पतंजली यांच्या
काळापर्यंत योग साधनेच्या अस्तित्वाची साक्ष प्राप्त होते. या काळातील योग
साधनेच्या अभ्यासासाठी ज्या मुख्य संदर्भाचा उपयोग होतो, यांत
प्रामुख्याने वेद (४), उपनिषद (१८), स्मृति, बौद्ध धर्म, जैन धर्म, पाणिनी, महाकाव्यातील (२) उपदेश, पुराण (१८) यांचा
समावेश आहे.(१) हे संदर्भ ग्रंथ योग साधनेच्या तत्कालीन अस्तित्वाचे प्रमाण देतात, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. योग साधना आणि त्यांच्या विकासात
अनेक ऋषी, मुनी, योगसाधक, योगगुरू आणि महात्मांचे योगदान आहे. महाभारत काळात देखील योगसाधनेचा उल्लेख अधिशय व्यापक स्वरूपात आढळतो. पुण्यग्रंथ 'श्रीमद भगवद्गीता' यात देखील ज्ञान योग, भक्ति योग आणि कर्म योग यांची संकल्पना
अधिक विस्तारीत स्वरूपात मांडली आहे. अशा या मानव
कल्याणकारी विद्येचा/साधनेचा आधुनिक काळात प्रसार आणि विस्तार करण्यात भारताचे
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांची भूमिका देखील महत्वाची ठरली आहे. नरेद्र मोदी
यांनी पहिल्यांदा २७ सप्टे २०१४ रोजी संयुक्त
राष्ट्र महासभा मध्ये दिलेल्या भाषणात योग बद्दल बोलताना त्यांनी आपली भूमिका
पुढील प्रमाणे मांडली
"योग भारत की प्राचीन परंपरा
का एक अमूल्य उपहार है यह दिमाग और शरीर की एकता का प्रतीक है; मनुष्य और प्रकृति के बीच
सामंजस्य है; विचार, संयम और स्फूर्ती प्रदान करने
वाला है तथा स्वास्थ्य और भलाई के लिए एक समग्र दृष्टिकोण को भी प्रदान करने वाला
है। यह व्यायाम के बारे में नहीं है, लेकिन अपने भीतर एकता की भावना, दुनिया और प्रकृति की खोज के
विषय में है। हमारी बदलती जीवन- शैली में यह चेतना बनकर, हमें जलवायु परिवर्तन से
निपटने में मदद कर सकता है। तो आयिए एक अंतर्राष्ट्रीय योग दिवस को गोद लेने की
दिशा में काम करते हैं।"—नरेंद्र मोदी, संयुक्त राष्ट्र महासभा
यानंतर २१ जून "जागतिक योग दिवस" म्हणून घोषित
करण्यात आला. ११ सप्टेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रच्या १७७ सदस्य देशांव्दारे २१
जून ला "जागतिक योग दिवस' म्हणून मान्यता देण्यात आली.
प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या या प्रस्तावास ९० दिवसाच्या
आत पूर्ण बहुमताने पारित करण्यात आले असून संयुक्त राष्ट्रात सादर करण्यात आलेल्या
प्रस्तावाचा सर्वात कमी अवधी आहे.(२) आजच्या धावपळीच्या युगात
संपूर्ण जगाचा विचार केला तर जवळपास २०% लोकसंख्या ही मानसिक तणाव आणि नैराश्येचा
त्रासाने ग्रासलेली आहे असे विविध संशोधनातून समोर आले आहे. कोविड-१९ मुळे निर्माण
झालेल्या परिस्थितीत कदाचित याची आकडेवारी आणखी वाढू शकते यात शंका नाही. मानसिक
आजाराने त्रस्त असणा-या व्यक्तींचे प्रमाण सतत वाढत आहे. मानसिक त्रास दूर
करण्यासाठी अनेक पद्धती विकसित झाल्या आहेत यात सर्वात सुलभ आणि परिणामकारक पद्धत
म्हणून योग साधनेचा वापर केला जातो. आपणंही नियमित योग
करून आपले जीवन निरोगी आणि आनंदी ठेवूया
पुन्हा एकदा आपल्या सर्वांना जागतिक योग दिनाच्या आरोग्यमयी
शुभेच्छा....
योग दिनानिमित्त जळगाव जिल्हा योग समन्वयक समिती व्दारे केलेला उपक्रम
हितेश ब्रिजवासी
ग्रंथपाल
विवेकानंद प्रतिष्ठान पुरस्कृत
के.ए.के.पी. संस्थेचे वानिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, जळगाव
संदर्भ:-
२) https://hi.wikipedia.org/wiki/अंतर्राष्ट्रीय_योग_दिवस
बहोत खूब
ReplyDeleteNice sir
ReplyDeleteखूप छान👌👌💐
ReplyDeleteBest sir
ReplyDeleteKeep it up
ReplyDeleteVery good sir
ReplyDeleteNice informative
ReplyDeleteVery nice and informative
ReplyDeleteNice sirji
ReplyDelete